चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने केली अटक
marathinews24.com
पुणे – विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारांची चोरी करणार्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख रूपये किंमतीचा ऐवज जप्त करीत दोन गुन्ह्याची उकल केली आहे. अंशुमन राम केवल यादव (वय १९ रा. शिरूर बायपास रोड, शिरूर ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलीस असल्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी
गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे एपीआय मदन कांबळे हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी ऋषीकेश ताकवणे यांना विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारांची चोरी करणार्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने यादव याला ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळिक, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.




















