Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

परप्रांतीय कामगाराचा कोरेगाव भीमा परिसरात खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

द्वेषभावनेतून खून नाही; पोलीस अधीक्षकांची माहिती

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील‘कोरेगाव भीमा परिसरातील पश्चिम बंगालमधील कामगाराचा किरकोळ वादातून ह खून झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. भाषिक वादावरून खून झाला नाही, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

शिक्षण संस्थेच्या आवारातून विद्यार्थ्याचा लॅपटाॅप चोरीला – सविस्तर बातमी 

सुखेन महातो (वय २४, सध्या रा. कोरेगाव भीमा, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ‘शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० फेब्रुवारी रोजी महातो मृतावस्थेत सापडला होता. महातो एका खासगी कंपनीत कामगार होता. ९ फेब्रुवारी दुपारी तीनच्या सुमारास तो कामावार जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. कोरेगाव भीमा परिसरात त्याने मद्यप्राशन केले. तो कामावर गेला नाही. ९ फेब्रुवारी रोजी त्याचा दोघांशी वाद झाला. वादातून त्याला मारहाण करून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीनासाह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे’, अशी माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली.

कोरेगाव भीमा भागात पश्चिम बंगलामधील एका कामगाराचा खून केल्याची घटना घडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी परप्रांतातून पुणे शहर, जिल्ह्यात कामानिमित्त स्थायिक झालेल्या कामगारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील तरुणाचा खून हा भाषिक द्वेषातून झाल्याची टीका बॅनजी यांनी समाज माध्यमातून केली आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी खुनामागचे कारण किरकोळ वाद असल्याचे सांगितले. खूनामागे द्वेषभावना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

‘मद्याच्या नशेत त्याचे दोघांशी वाद झाला.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, प्राथमिक चौकशीत महातो याने मद्यप्रशन केल्यानंतर त्याचा दोघांशी वाद झाला. त्याच्या खुनामागे अन्य कोणतेही कारण नाही’, असे त्यांनी नमूद केले. पश्चिम बंगालमधील कामगार सुखेन महातो याचा पुणे परिसरात खून झाला. यातील आरोपींना अटक करण्यात यावी. हा गुन्हा द्वेषातून झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, कामगाराच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी समाज माध्यमात दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×