शिक्षण संस्थेच्या आवारातून विद्यार्थ्याचा लॅपटाॅप चोरीला

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

कोथरूड पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोथरूड भागातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेच्या आवरातून विद्यार्थ्याकडील एक लाख ८० हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महाविद्यालयीन तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू न पाजल्याने तरूणाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण पौड रस्ता परिसरातील एक नामवंत शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी तो महाविद्यालयाच्या आवारात आला. त्याने त्याच्याकडील बॅगेत लॅपटाॅप ठेवला होता. त्याचे लक्ष नसल्याची संधी साधून बॅगेतून लॅपटाॅप चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवराातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस हवालदार दळवी तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एका सदनिकेतून महाविद्यालयीन तरुणाचा लॅपटाॅप चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण नऱ्हे भागातील एका सोसायटीत राहायला आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटा आत शिरला. चोरट्याने महागडा मोबाइल आणि लॅपटाॅप असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पाेलीस हवालदार कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×