Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पीएमपील बसमध्ये मोबाइल चोरणारा अल्पवयीन ताब्यात

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन प्रवाशांचे मोबाइल चोरणार्‍या अल्पवयीनाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना ८ सप्टेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसर गाडीतळ बसप्रवासात घडली होती. याप्रकरणी वाघोलीत राहणार्‍या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या महिलांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी वाघोलीत राहायला असून, ८ सप्टेंबरला हडपसर गाडीतळ परिसरातून बस प्रवास करीत होती. त्यावेळी अल्पवयीन मुलाने तिचा मोबाइल चोरला. त्यानंतर दुसर्‍याही एका प्रवाशाचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी मुलीने तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार ओंबासे तपास करीत आहेत.

घरातून सोन्याच्या बांगड्या चोरीला

घरातील बॅगेतून चोरट्यांनी १ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ही घटना ७ ते ८ सप्टेंबरला येरवड्यातील वडारवस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला कुटूंबियासह येरवड्यातील वडारवस्ती परिसरात राहायला आहेत. ७ ते ८ सप्टेंबरला चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर बॅगेतून १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×