Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

लोणावळा दिवाळी मार्केट फेस्टिवल ला ३०,००० हुन अधिक नागरिकांनी दिली भेट

लोणावळा दिवाळी मार्केट फेस्टिवल ला ३०,००० हुन अधिक नागरिकांनी दिली भेट

६० लाखांहून अधिकची उलाढाल

marathinews24.com

लोणावळा – लोणावळा वुमन्स फाउंडेशन तर्फे कुमार रिसॉर्ट, लोणावळा येथे ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या “दिवाळी मार्केट २०२५” या भव्य उपक्रमाला नागरिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चाललेल्या या मार्केटला तब्बल ३०,००० हून अधिक नागरिकांनी भेट देत दिवाळीची खरेदी आणि विविध उपक्रमांचा आनंद लुटला.

युवा सक्षमीकरणाचे शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय- डॉ. विजय भटकर – सविस्तर बातमी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजक, महिला स्वयंरोजगार गट आणि हौशी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी या मार्केटचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू असलेले हे मार्केट नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या लोणावळा वुमन्स फाउंडेशनचा उद्देश प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि तिच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे हा आहे. या ध्येयातून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी मार्केटचे आयोजन करण्यात आले.

या मार्केटमध्ये फॅशन, ज्वेलरी, घरसजावटीच्या वस्तू, स्वादिष्ट फराळ, हँडमेड उत्पादने, लहान मुलांसाठी खेळ व मनोरंजन असे शेकडो स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच खवय्यांसाठी खास फूड झोन आणि दररोज आकर्षक लकी ड्रॉ या विशेष आकर्षणांनी उपस्थितांची मने जिंकली.

या यशस्वी आयोजनानंतर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. ब्रिंदा अनिश गणात्रा म्हणाल्या, “या वर्षी दिवाळी मार्केटला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. महिलांनी आणि स्थानिक उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्या कला, उत्पादने आणि आत्मविश्वासाला मिळालेलं हे व्यासपीठ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या माध्यमातून ‘व्होकल फॉर लोकल’ या उपक्रमाला निश्चितच नवी गती मिळाली आहे.”

या दोन दिवसीय उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर लोणावळा वुमन्स फाउंडेशनने पुढील काळात अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×