Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पादचारी शिक्षिकेचे मगळसूूत्र हिसकावले

लोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी शिक्षिकेचे दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिक्षिकेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमधील रूग्णालयात सापडलेली वस्‍तू आयईडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षिका बुधवारी (१३ मे) रात्री नऊच्या सुमारास आंबेगावमधील दत्तनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. शिक्षिकेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दत्तनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

शिवाजीनगर भागात हाॅटेलमध्ये चोरी

शिवाजीनगर भागताील हाॅटेलमधील खोलीतून १ लाख ७० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.

याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे छत्तीसगडमधील राजनंदगाव परिसरातील राहायला आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. शिवाजीनगर स्थानक परिसरातील एका हाॅटेलमध्ये त्यांनी खोली भाड्याने घेतली होती. रात्री झोपताना त्यांना उशीखाली १ लाख ७० हजार रुपयांची सोन्याची अंगठी ठेवली होती. चोरट्याने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून उशीखाली ठेवलेली अंगठी चोरुन नेली. अंगठी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून हाॅटेलमधील कामगारांची चौकशी करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×