Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

हडपसरमधील रूग्णालयात सापडलेली वस्‍तू आयईडी

रुग्णालयात घातपाताचाच डाव

marathinews24.com

पुणे – हडपसर परिसरातील रुग्णालयात सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्बसदृश नसून ती प्रत्यक्षात आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोसीव्ह डिव्हाईस) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक यंत्रणाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडविण्याचा डाव होता का, याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक तसेच पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू केला आहे.

सासवड दिवे घाटात १०० ते १५० दुचाकीस्वारांनी कोयते नाचवले – सविस्तर बातमी

हडपसर भागातील कामधेनू इस्‍टेटच्‍या मागील बाजून हे खासगी रुग्णालय आहे. या रूग्णालयाच्‍या पहिल्या मजल्यावरील शौचालयात बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीला संशयास्पद वस्तू आढळून आली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, वस्तू बॉम्बसदृश दिसत असतानाही रुग्णालय प्रशासनाने व वरिष्ठ डॉक्टरांनी ती वस्तू पहिल्या मजल्यावरील शौचालयातून बाहेर काढून मोकळ्या मैदानात ठेवली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्‍या माहितीनुसार या आयईडीमध्ये जिलेटिन, टायमर, डिटोनेटर, वायर, ॲल्युमिनियम कव्हर आणि सेन्सर आढळून आले आहेत. हे सर्व साहित्य आयईडी तयार करण्यासाठी वापरले जाते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. हाच जर स्फोट दवाखान्याच्‍या शौचालयात घडला असता तर जिवीत हाणीला देखील सामोरे जावे लागले असाही अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, रुग्णालयात किंवा परिसरात मोठा घातपात घडविण्याचा कट होता का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दिसून आलेल्या एका तरुणासह १५ ते १७ जणांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.

आयईडी अत्यंत सराईतपणे बनविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या मागे प्रशिक्षित किंवा स्फोटकांबाबत माहिती असलेल्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध तपास पथके या प्रकरणाचा समांतर तपास करत असून, फॉरेन्सिक विभाग आणि बीडीडीएसने घटनास्थळावरील नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने पुढील परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×