पीएमपीएलच्या धडकेत पादचारी महिला ठार

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

हडपसरमधील गाडीतळ परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वेगातील पीएमपीएल बसचालकाने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाली. हा अपघात १६ डिसेंबरला सकाळी अकराच्या सुमारास हडपसरमधील गाडीतळ परिसरात घडली आहे. अपघातानंतर सामाजिक संघटनांसह पदाधिकार्‍यांनी परिसरात आंदोलन केले. त्यासोबतच पीएमपीएल प्रशासनातील अधिकार्‍यांना धारेवर धरून विचारणा केली. सुमन हनुमंत क्षीरसागर (वय ४९ रा. मार्वेâटयार्ड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपीएल बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅसजोडणी तोडण्याची घातली भीती, जेष्ठाला २३ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी सुमन क्षीरसागर मार्वेâटयार्ड परिसरात राहायला होत्या. १६ डिसेंबरला सकाळी अकराच्या सुमारास हडपसर परिसरातील गाडीतळ येथून पायी जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील बसचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सुमनला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करीत आहेत.

पीएमपीएल बस चालक सुसाट, प्रशासन सुस्त

प्रवाशांची ने-आण करणार्‍या पीएमपीएल बसचे चालक सुसाट असल्याचे वारंवार घडणार्‍या अपघातावरून दिसून आले आहे. त्यामुळे बसजवळून वाहन चालवावे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. विशेषतः बहुतांश बस चालकांकडून बेदरकारपणे गाड्या चालविल्यामुळे अपघात घडले आहेत. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित चालकांना शिस्तीचे धडे देण्याची गरज असून, त्यासाठी पीएमपीएल प्रशासनाला जाग कधी येणार, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×