Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

पोलीस कर्तव्य मेळाव्यामुळे तपासाचे कौशल्य वाढीस

पोलीस कर्तव्य मेळाव्यामुळे तपासाचे कौशल्य वाढीस

दत्ता पडसलगीकर यांचे मत

marathinews24.com

पुणे – ’पोलीस कर्तव्य मेळावाच्या माध्यमातून सहभागी संघातील पोलीस कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढणार आहे. त्याचा फायदा पोलीस दलास होणार आहे’, असे मत राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी (दि.१७) व्यक्त केले. राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारात २० व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कॅबिनेट मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न – सविस्तर बातमी 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. राजेंद्र डहाळे, पिंपरी-चिंचवडचे सहपोलीस आयुक्त सुहास महानवर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर, लष्करी गुप्तचर यंत्रणेचे संचालक एम. रामकुमार, उपमहानिरीक्षक बसवराज तेली, अमोल गावकर, तेजस्वी सातपुते, पल्लवी बर्गे उपस्थित होते.

पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेल्या पाेलीस संघांना दत्ता पडसलगीकर यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेले संघ तपास कौशल्य सादर करतात. तपास शास्त्रीयदृष्ट्या कसा करावा, पुराव्याचे संकलन अशा बाबींचे प्रात्यक्षिक सादर केले जातात. पोलीस कर्तव्य मेळाव्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे तपास कौशल्य वाढीस लागणार आहे. या मेळाव्यात सहभागी झालेल्याा पोलीस कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची चित्रफीत तयार करुन ती राज्यातील विविध पोलीस घटकात प्रसारित करावी.’सुनील रामानंद यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. राजेंद्र डहाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×