बोपोडी जमीन प्रकरणात शीतल तेजवाणीसह चौघांना पोलिसांची नोटीस

हजर राहून जबाब देण्याची नोटीस

marathinews24.com

पुणे – शहरातील कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांनी शीतल तेजवाणी, हेमंत गवंडे यांच्यासह चौघांना जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. याप्रकरणात गवंडे हे शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांनी जबाब नोंदविला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीवर बोपोडी, कोरेगाव पार्क भागातील जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

दारूच्या नशेत नागरिकांसह व्यापार्‍यांना शिवीगाळ भोवली – सविस्तर बातमी

बोपोडी जमीन प्रकरणात ‘अमेडिया’ कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी यांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. याप्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. शासकीय विभागांकडून जमीन व्यवहाबाबत झालेल्या कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. त्यानंतर याप्रकरणात शीतल तेजवानी, हेमंत गवंडे, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह चैाघांना जबाबा नोंदविण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी गवंडे हे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले.

जबाब नोंदविल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बोपोडी प्रकरणात माझ्यावर चुकीने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची कागदपत्रे पोलिसांना मी दिली आहे. मी पोलिसांना सहकार्य करत आहे. दरम्यान, शीतल तेजवाणी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत तिने अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×