Breking News
शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडापुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीलामाॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना

जाब विचारल्याने मारहाण करणारे अटकेत

marathinews24.com

पुणे – दुचाकी घेउन गेल्याचा जाब विचारल्यामुळे टोळक्याने सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना ११ फेबु्रवारीला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास लोहगावमधील व्हीआयपी इन हॉटेलसमोर घडली आहे. लोहगाव पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना अटक केली आहे. सिद्धार्थ दत्तु जाधव (वय २४, रा. योजनानगर, लोहगाव,) आकाश हरेद्र शर्मा (वय २२ रा. पवारवस्ती, लोहगाव) आणि गणेश संतोष माने (वय २५, रा. माळवाडी रस्ता लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोरखनाथ शिर्वेâ (वय ६५, लोहगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

लोणी काळभोरमध्ये घरफोडी, ३ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गोरखनाथ शिर्के हे पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले असून, ते कुटूंबियासह लोहगावमध्ये राहायला आहेत. त्यांच्या मुलाची दुचाकी टोळके घेउन गेले होते. त्यामुळे मुलाने संबंधितांना दुचाकी घेउन गेल्याचा जाब विचारला. त्याच रागातून टोळक्याने दांडक्याने, दगडाने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर टोळके पसार झाले होते. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×