Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दोन घरफोड्यांमध्ये ६ लाखांचा ऐवज लांबवला

दोन घरफोड्यांमध्ये ६ लाखांचा ऐवज लांबवला

संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी ५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटना बाणेर आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस – सविस्तर बातमी 

तक्रारदार मनोहर जयवंतराव बर्फे (४९, रा. रामवाडी मेट्रो स्टेशन जवळ) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घराचे कुलूप तोडून चोरांनी ४ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, चोरट्यांनी शंकर रघुनाथ कोलते ( वय ६९, रा. ब्राव्हरीया सोसायटी, बाणेर बालेवाडी रोड) यांच्या घरात चोरी केली. ९ ते १२ नोव्हेंबर कालावधीत कोलते गावी गेलेले असताना चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटातील १ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×