Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायावर छापा

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायावर छापा

हडपसर भागात कारवाई

marathinews24.com

पुणे – मसाज पार्लरच्या नावाखली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. पोलिसांनी हडपसर भागात मसाज पार्लरवर छापा टाकून व्यवस्थापकाला अटक केली. कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ शामराव इंगळे (वय २८, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

परप्रांतीय कामगाराचा कोरेगाव भीमा परिसरात खून – सविस्तर बातमी 

हडपसरमधील गाडीतळ परिसरात असलेल्या एका इमारतीत व्हाईट पर्ल स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजममा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरचा व्यवस्थापक इंगळे याने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मसाज पार्लरमधून तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशाल चव्हाण, तुषार भिवरकर, दताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, रेश्मा कंक, भुजबळ यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×