Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव नोंदणी करा

पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव नोंदणी करा

विभागीय डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे निर्देश 

marathinews24.com

पुणे – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. विभागातील अधिकाधिक पात्र मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची कार्यवाही करावी, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन – सविस्तर बातमी 

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या अनुषंगाने सहायक नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांकरिता आयोजित प्रशिक्षणसत्रात ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, निवडणूक तहसीलदार राहूल सांरग आदी उपस्थित होते. तसेच सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी करतांना प्रचलित कायदे आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे तंतोतत पालन करावे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आलेल्या वेळापत्रकाचे पालन करत पारदर्शकपणे काम करावे. मतदार यादीचे काम पारदर्शकपणे करुन यादी बिनचूक तयार करावी. एकगठ्ठा पद्धतीने अर्ज स्विाकारले जाणार नाहीत, अपात्र मतदारांची शिफारस केलेली आढळल्यास निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व संबंधितांना बैठक घेवून सूचना द्याव्यात. मतदार नोंदणीकरिता नियुक्त अधिकारी आजारी पडल्यास किंवा अन्य काही अडचणीमुळे रजेवर असल्यास त्याच्या जागी इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करुन काम थांबणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक मतदार नोंदणीची प्रक्रिया पार पाडतांना समन्वय साधून कामे करावे, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

ठोंबरे म्हणाले, सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ठ असले तरी आता पात्र मतदारांचे नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, अशा आयोगाचे निर्देश आहेत. मतदार नोंदणी करतांना सर्व कागदपत्रांची तपासणी करुनच नोंदणी करावी. नवीन मतदार नोंदणीचे अर्ज मतदार नोंदणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, याबाबत दक्षता घ्यावी. मतदारांना मतदार नोंदणी करण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करावे. विभागात ‘स्वीप’ अंतर्गत मतदार नोंदणीबाबचे कार्यक्रम राबवून मतदार नोंदणीबाबत जनजागृती करावी, अशा सूचना ठोंबरे यांनी दिल्या.

प्रशिक्षण सत्रात मतदार नोंदणीचे टप्पे, मतदार नोंदणीचे अर्ज भरतांना घ्यावाची काळजी, अर्जाची छाननीपक्रिया, मतदार अर्हता, शैक्षणिक कागदपत्रे, मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम, संदर्भ परिपत्रके, शासन निर्णय, आदेश आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×