हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप मोहन चव्हाण (वय २३, रा. थिटे वस्ती, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात गँगवारातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मुलीला आरोपी संदीप चव्हाणने मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या मुलीने याची माहिती आईला दिली. त्यानंतर आरोपी चव्हाणविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे तपास करत आहेत.



















