Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान, आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान २०२५ राबविण्यात आले; या अभिनयात एकूण १ लाख ६५ हजार ७१८ महिला व पुरुषांनी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. या कालावधीत सुमारे २ हजार ५२५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याममध्ये ४ हजार ३०४ नागरिकांचे रक्तदान,५ हजार २५५ नागरिकांची आयुष्यमान कार्ड नोंदणी, ३ हजार ६१३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

येरवडा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – सविस्तर बातमी

शिबिरांत नेत्ररोग, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, महिलांचे आरोग्य, रक्त तपासणी, सर्वरोग निदान, रक्तदान शिबिरे तसेच आजाराविषयी मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासोबतच लाभार्थींना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. या अभियानाचा उद्देश गणेशोत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक नागरिकाला प्राथमिक तपासणी व उपचाराची संध उपलब्ध करून देणे हा होता.

अभियानात पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा, एमजेपीजेएवाय, सीएमआरएफ व धर्मादाय रुग्णालयांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जिल्हा समनव्यक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×