पुण्यात दिव्यांगांसाठी विशेष सक्षमीकरण शिबिर; विविध विभागाचा संयुक्त सहभाग
marathinews24.com
पुणे – शहरातील गणेशखिंड रोडवरील बालकल्याण संस्था येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्यातर्फे “दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष सक्षमीकरण शिबिर” आयोजित करण्यात आले. उपक्रमाची अंमलबजावणी उच्च न्यायालय, मुंबई यांच्या बाल न्याय समिती तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. महेंद्र के. महाजन (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे) होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण पुरी (आयुक्त, दिव्यांग विभाग, महाराष्ट्र राज्य), परेश गांधी (सीईओ, दिव्यांग भवन, पुणे), प्रतापराव पवार (अध्यक्ष, बालकल्याण संस्था, पुणे) तसेच वायसीएम रुग्णालय, औंध सिव्हिल सर्जन कार्यालय व इतर आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कडबनवाडीत जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन – सविस्तर बातमी
या शिबिराचा मुख्य उद्देश दिव्यांग मुलांना कायदेशीर, वैद्यकीय आणि सामाजिक सेवा एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षमीकरण करणे हा होता. शिबिरामध्ये UDID नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आदी सेवा पुरविण्यात आल्या. उपस्थित दिव्यांग मुलांना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहाय्यक साधनांचे (व्हीलचेअर, श्रवणयंत्र इ.) वितरण करण्यात आले. उपक्रमात विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, महिला व बालविकास विभाग, वैद्यकीय पथक, बालकल्याण समिती आदींचा सक्रीय सहभाग लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल एस. पाटील यांनी केले.