“महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार
marathinews24.com
पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा आणि न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी परीक्षामध्ये निवड झालेल्या गुणवंत मुस्लिम विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीकडून करण्यात आला.
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जकात फाउंडेशन ऑफ इंडिया (दिल्ली) चे संस्थापक अध्यक्ष सय्यद जफर मेहमूद, राज्याचे जीएसटी कर आयुक्त मेहबूब कासार, सौ. कासार, यशदा ,बार्टी चे माजी संचालक रविंद्र चव्हाण,महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव प्रा. इरफान शेख उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए. के. के. न्यू लॉ अकॅडमी व पीएचडी सेंटर येथे उभारण्यात आलेल्या डॉ. पी. ए. इनामदार स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कुंकवातील भेसळ थांबवा त्वचेसाठी धोकादायक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी
सय्यद जफर मेहमूद अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने दैवी देणगी दिलेली असते, क्षमता दिलेली असते, त्याचा उपयोग करून समाज प्रगतिशील केला पाहिजे. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “तुम्हाला कोणी शाबासकी देईलच, पण त्यासाठी योग्य कृती करत रहा – त्यातून समाज अधिक सशक्त होईल.”मेहबूब कासार यांनी देखील विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा दिली. स्पर्धा परीक्षांचे महत्व सांगून त्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, आजचे विद्यार्थी उद्याचे आधार आहेत आणि ते समाजासाठी दीपस्तंभ ठरतील. महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार म्हणाल्या, ‘मेहनतीचे फळ नेहमी गोड असते. शिस्त, परिश्रम आणि यशाची महत्वाकांक्षा ही त्रिसुत्री चे पालन केले पाहिजे. गुणी मुस्लिम विद्यार्थ्यांचा केवळ मुस्लिम समुदायालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अभिमान आहे. एमसीई सोसायटी ही एक उदात्त शैक्षणिक संस्था असून तिच्या मार्फत होणारे कार्य सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. प्रा. इरफान शेख यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जेसिंटा बॅस्टियन आणि डॉ. स्वाती शिंदे यांनी केले.