बीडच्या ऊसतोड मजुराची साताऱ्यात हत्या

आरोपीचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

marathinews24.com

बीड – ऊसतोड मजुराला जेवण करण्याच्या बहाण्याने नेऊन पाय बांधून दगडाने डोके ठेचून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२०) दुपारी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आली. मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४२, रा. उखळबाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी अजय राजेंद्र माने (रा. भोसे, ता. कोरेगाव) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने स्वतः ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

प्रेमसंबंधातून तरुणावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र भोसले हे गेल्या चार वर्षांपासून जरंडेश्वर शुगर मिलसाठी ऊस तोडणीचे काम करत होते. १५ जानेवारीला रात्री आरोपी अजय माने याने मच्छिंद्र यांना हॉटेलमध्ये जेवायला नेतो असे सांगून शेतात नेले. तिथे त्यांचे पाय बांधून दगडाने डोके ठेचून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. पती घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने १७ जानेवारीला कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मंगळवारी सकाळी आरोपीच्या वडिलांना शेतात मृतदेह आढळल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील मजूर आणि नेत्यांनी जरंडेश्वर कारखाना परिसरात धाव घेऊन ठिय्या आंदोलन केले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत. आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यामुळे पुढील तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×