प्रेमसंबंधातून तरुणावर शस्त्राने वार

हडपसरमध्ये अल्पवयीनावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रेम संबंधातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मुंढवा भागात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.प्रवीण धनंजय माने (वय २४, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश सरोदे (वय ३५, रा. भीमनगर, मुंढवा) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मानेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात तरुणाला लुटले, ऑनलाइन १० हजार रुपये घेतले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेचे एका तरुणीशी प्रेमसंबध आहे. आरोपी सरोदेने माने याला तरुणीशी असलेले प्रेमसंबध तोडण्यास सांगितले होते. १९ जानेवारीला सरोदेने माने याला मुंढव्यात बोलावून घेतले. सरोदे आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी मानेला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारु, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. माने याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या सरोदे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शाेध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पिंगुवाले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×