कोंढव्यात तरुणाला लुटले, ऑनलाइन १० हजार रुपये घेतले

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून त्याला लुटण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मेफेड्रोन विक्रीत अहिल्यानगरचा हवालदार गोत्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोंढव्यातील पिसोळी भागात राहायला आहे. गेल्या महिन्यात तो कोंढव्यातील कौसरबाग परिसरातून निघाला होता. त्या वेळी कौसरबाग परिसरात त्याला दाेन चोरट्यांनी त्याला अडवले. तरुणाला शस्त्राचा धाक दाखविण्यात आला. तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल, चांदीचे कडे काढून घेतले. तरुणाला धमकावून त्याच्याकडून १० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांनी स्वत:च्या खात्यात जमा करुन घेतले. या घटनेनंतर तरुण घाबरला होता. त्याने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. पोलिसांनी कौसरबाग परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×