Breking News
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अपुरी कामे तातडीने पूर्ण करावीतपतीच्या अनैतिक संबंधामुळे महिलेची आत्महत्यापुण्यात तरुणाकडून १० लाखांचा गांजा जप्तMonsoon Update : महाराष्ट्रात मान्सून का लांबणीवर जातोय…कधी होणार मान्सूनला सुरवात?असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही- प्रा मिलिंद जोशीपुण्यात सायबर चोरट्यांकडून ६ कोटी २५ लाखांची फसवणूकब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरीलाफ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणीमहिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

सुप्रिया सुळे यांच्या मोटारीचा द्रुतगती मार्गावर अपघात

मोटारीतील सर्वजण सुखरुप

marathinews24.com

पुणे – खासदार सुप्रिया सुळे यांच्या मोटारीचा अपघात झाल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली. मोटारीतील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती सुळे यांनी समाज माध्यमातून दिली आहे.

हवाई दलाच्या तळात बेकायदा प्रवेश करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

सुप्रिया सुळे आणि सहकारी हे मोटारीतून द्रुतगती मार्गावरून निघाले होते. द्रुतगती मार्गावर त्यांच्या मोटारीचा अपघात झाला. अपघातात कोणालाही इजा झाली नाही. मोटारीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुळे यांनी त्यांच्या समाज माध्यमातील खात्यावरुन दिली आहे. ज्या वाहनाने सुळे यांच्या मोटारीला धडक दिली. त्या वाहनाची वाहन क्रमांकाची पाटीचे छायाचित्र त्यांनी समाज माध्यमात प्रसारित केले आहे.

मोटारीतून २ लाखांची रोकड चोरीला

पुणे- मोटारीत ठेवलेली २ लाखांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका शेतकऱ्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अडते आहेत. ते लोणी काळभोर भागातील शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करतात. ही फुले घाऊक बाजराात विक्रीस पाठवितात. कुंजीरवाडी परिसरात त्यांनी मोटार लावली होती. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी त्यांनी दोन लाखांची रोकड मोटारीत ठेवली होती. चोरट्यांनी मोटारीतून दोन लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×