Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

बाह्यवळण मार्गावर बसवर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दरी पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर ट्रक आदळून ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले.

पुण्यात बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी

हुसेन अब्बास सय्यद (वय ५५, रा. शिरा टाऊन, मंगळापेठ, कर्नाटक ) असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा चालक प्रविण दत्तात्रय कांबळे (वय ३१, रा. शेळेवाडी, ता. राधानगरी, कोल्हापूर) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून प्रवासी वाहतूक करणारी खासगी आराम बस मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास कोल्हापुरकडे निघाली होती. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर दरीपुलाजवळ भरधाव ट्रकने बसला पाठीमागून धडक दिली. अपघातात ट्रक चालक सय्यद गंभीर जखमी झाला. अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचे, तसेच बसचे नुकसान झाले. अपघातात बसमधील काही प्रवाशांना दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्य सहायाने बाजूला नेला. अपघातात गंभीर जखमी झालेला ट्रक चालक सय्यद याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या बसमधील प्रवाशांवर उपचार करण्यात आले. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×