Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

रिक्षाचालकाकडून प्रवासी तरुणाची लूट

रिक्षाचालकाकडून प्रवासी तरुणाची लूट

वाकडेवाडी भागातील घटना

marathinews24.com

पुणे – रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाला धमकावून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना वाकडेवाडी भागात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका प्रवासी तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकासह तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिल्डर अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा ओदिशातील आहे. तो सध्या अहिल्यानगरमध्ये वास्तव्यास आहे. तक्रारदार तरुण मूळगावी निघाला होता. शनिवारी (२० जून) मध्यरात्री अडीचच्या सुमारास तो अहिल्यानगरहून एसटी बसने वाकडेवाडीतील एसटी स्थानक परिसरात उतरला. त्यानंतर तो रिक्षातून पुणे रेल्वे स्थानकाकडे निघाला होता. रिक्षाचालक आणि साथीदाराने वाटेत रिक्षा अडवली. प्रवासी तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, रोकड, मोबाइल संच असा एक लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून रिक्षाचालक आणि साथीदार पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरी

रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपयांचे सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ महिला कात्रज भागात राहायला आहेत. त्या शनिवारी (२० जून) दुपारी पावणेतीनच्या सुमारास पुणे पोलीस आयुक्त कार्यालय ते ससून रुग्मालय दरम्यान रिक्षाने प्रवास करत होत्या. रिक्षात अन्य प्रवासी होते. प्रवासादरम्यान त्यांच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपायंची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×