टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरिबा कुरेशी (वय २०, रा. फेअर ग्रेस सोसायटी, न्यू मोदीखाना, लष्कर ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक विश्वंभर दशरथ सोनवणे (वय ६२, रा. मारुतीनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरिबाचे वडील अर्शदअली अख्तरअली कुरेशी (वय ५५) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीएमपी थांब्यावर शाळकरी मुलावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आरिबा २७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन स्वारगेटकडे निघाली होती. त्यावेळी भरधाव टेम्पोने हिराबाग चौकात दुचाकीस्वार आरिबाला धडक दिली. अपघातात ती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या आरिबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यना ती मरण पावली. पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×