Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

दुचाकी घसरून पुणे-सातारा रस्त्यावर एक जण तर टेम्पोच्या धडकेत हडपसर-सासवड रस्त्यावर दोन जणांचा मृत्यु

marathinews24.com

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष कराड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भविष्य सांगण्याच्या बतावणीने तरुणाची अंगठी लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजय जेधे हे मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाले होते. कात्रज भागातील बीआरटी मार्ग परिसरात भरधाव दुचाकी घसरली. अपघातात दुचाकीस्वार जेधे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या घटनेची नोंद भारती विद्यापीठ पोलिसांनी केली असून, हवालदार भोसले तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश सुधाकर कर्णे (वय ३९, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे.

याबाबत दीपक प्रकाश निकम (वय ३९, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दीपक निकम आणि त्यांचे मित्र सुरेश कर्णे हे गुरुवारी (३ जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरुन दुचाकीवरुन निघाले होते.

वडकी नाला परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी कर्णे हे गंभीर जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कर्णे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×