येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – प्रीपेड टास्क पुर्ण करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणाला ऑनलाईनरित्या तब्बल ६ लाख ३८ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २४ जून ते १ जुलै कालावधीत येरवड्यात घडली आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा येरवड्यात राहायला असून, २४ जूनला सायबर चोरट्याने त्याला संपर्क केला. व्हॉटसअॅपवर लिंक पाठवून देत प्रीपेड टास्क पुर्ण करण्याचे काम दिले. टास्क पुर्ण केल्यास अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला जाळ्यात अडकविले. अवघ्या आठवड्यातच सायबर चोरट्यांनी तरूणाकडून तब्बल ६ लाख ३८ हजार रूपये वर्ग करून घेतले. मात्र, त्याला कोणताही परतावा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करीत आहेत.





















