Breking News
पुण्यातील भवानी पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खूनफुरसुंगीत तरुणांच्या खुनाचा प्रयत्न; दोघे जखमीपुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’राज्य शासनातर्फे तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलन घेणारसामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्नपुण्यात रेस्क्यू’ फाउंडेशन मधून १२ बांगलादेशी महिला पळाल्‍यापुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूकधनकवडीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’कारवाईबीड जिल्ह्यात १४ एप्रिलला डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदीसासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय, गुन्हा दाखल

कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय, गुन्हा दाखल

आंबेगाव पोलिसांकडून गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या सहा महिलांविरुद्ध आंबेगाव पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. बाह्यवळण मार्गावर थांबून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांविरुद्ध या भागातील स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. बाह्यवळण मार्गावरील आंबेगाव परिसरात महिला थांबतात. संबंधित महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या.

भरधाव टँकरची दुचाकीला धडक; तरुण ठार – सविस्तर बातमी 

रहिवाशांना त्याचा त्रास होत होता. पोलिसांनी या प्रकरणी सहा महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पाच अन्वये नोटीस बजावली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत. नवले पूल परिसरात रस्त्यावर थांबून काही महिला वेस्यावय्वसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलिसांनी तेथे कारवाई करुन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×