Breking News
पुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’राज्य शासनातर्फे तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलन घेणारसामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्नपुण्यात रेस्क्यू’ फाउंडेशन मधून १२ बांगलादेशी महिला पळाल्‍यापुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूकधनकवडीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’कारवाईबीड जिल्ह्यात १४ एप्रिलला डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदीसासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्याजुन्या वादातून दोन तरुणांवर हल्ला; पोटात चाकू भोसकलाज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, ८२ ठिकाणी झाडपड

पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, ८२ ठिकाणी झाडपड

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोसळलेली झाडे केली बाजूला

marathinews24.com

पुणे – अवकाळी पावसाच्या तडाख्याने शहरातील विविध भागात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. वारजे रविवार पेठ, पाटील प्लाझा, सॅलिसबरी पार्क या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच सिंहगड रोड परिसरात झाड पडून एक महिला गंभीर जखमी झाली. अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात वर्दी मिळताच जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोसळलेली झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला.

पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, ८२ ठिकाणी झाडपड – सविस्तर बातमी  

झाडपीडमुळे नागरिकांच्या दुचाकी,चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि.२ ) दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. धो-धो कोसळणारा पाऊन आणि सुसाट सुटलेला वाऱ्यामुळे वानवडी, पुणे विद्यापीठ रोड, बाणेर, चव्हाण नगर, औंध , डीपी रोड, सिंहगड रोड, बिबबेवाडी, गंगाधाम, जनता वसाहत, नवीन प्रशासकीय इमारत काळेपडळ , तरवडे वस्ती , बी.टी.कवडे रोड, ससाणे नगर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क, महर्षी नगर, धनकवडी, कात्रज, वारजे, वडगाव शेरी कात्रज, पाषाण परिसरात झाडे पडली. तर वारजे सह्याद्री शाळा, रविवार पेठ, सॅलिसबरी पार्क , पाटील प्लाझा या ठिकाणच्या परिसरात पाणी शिरले.

पावसाने शहरातील वाहतूक मंदावली होती. पाण्यातून दुचाकी काढताना नागरिकांना कसरत करावी लागली. दुपारी अडीच वाजतापासून अग्निशमन दलाच्या मध्यवर्ती केंद्रात झाडपडी आणि पाणी शिरल्याचे कॉल येऊ लागले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील विविध भागात ८२ ठिकाणी झाडपडीच्या तर सहा ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटनांची नोंद झाली होती. तसेच एका ठिकाणी सीमाभिंत कोसळ्याची वर्दी होती. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम करत होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×