Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पाषाण- बाणेर लिंक रस्त्यावरील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली घटना

marathinews24.com

पुणे – सिमेट मिक्सरच्या चाकाखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना पाषाण- बाणेर लिंक रस्त्यावरील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली. अनिल उमाशंकर यादव (वय २५, सध्या रा. लव्हिन्स अटायना टाॅवर, लेबर कॅम्प, पाषाण-बाणेर लिंक रस्ता, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरचालक दीपककुमार उपेंद्र यादव (वय २२, सध्या रा. एचपी पेट्रोल पंपाजवळ, चांदे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमद सद्दाम अन्वर (वय २८, रा. एचपी पेट्रोल पंपाजवळ, चांदे, ता. मुळशी) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भाजपचे गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावर गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. ९ जानेवारीला दुपारी पावणेतीनच्या सुमारास सिमेंट मिक्सर गृहप्रकल्पाच्या आवारात आला होता. त्यावेळी बांधकाम मजूर अनिल यादव तेथे काम करत होता. सिमेंट मिक्सर मागे नेत असताना पाठीमागे थांबलेला अनिल चाकाखाली सापडला. अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. मिक्सर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली. याप्रकरणी मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×