Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

जेष्ठाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे आमिष महागात

जेष्ठाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे आमिष महागात

२२ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल २१ लाख ६४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ डिसेंबर ते १४ जानेवारी २०२६ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यात दोन गटात भांडण, परस्परविरोधी गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, ३१ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क केला होता. त्यावेळी त्यांना क्रिप्टो करन्सी व ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी संबंधित जेष्ठाला गुंतवणूकीला भाग पाडले. अवघ्या १५ दिवसांत तब्बल २१ लाख ६४ हजार रूपयांची गुंतवणूक त्यांनी केली. मात्र, जेष्ठाला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×