Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

फसवणूकग्रस्तांना न्याय द्या; अन्यथा विधान भवनावर विराट मोर्चा

यशवंत नडगम यांचा इशारा

marathinews24.com

पुणे – शेतकरी, कष्टकरी व हातावर पोट असलेल्या हजारो सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ‘समर्थ कॉप केअर’ या संस्थेविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दलित पँथरच्यावतीने गुरुवारी (दि.२६) पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. त्यानंतर घोषणाबाजी करत मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकला. आंदोलनाचे नेतृत्व दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले.

पुणे शहरातून ९ गुन्हेगार तडीपार – सविस्तर बातमी

फसवणूक प्रकरणातील मुख्य व सहआरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व एजंट व मध्यस्थांवर गुन्हे दाखल करून आरोपींची बँक खाती, मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी व जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी केली. फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांना कायदेशीर संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली.

यशवंत नडगम म्हणाले की, चार दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मुंबई येथे विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येईल. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. आंदोलनात श्रीकांत लोणारे, संतोष गायकवाड, स्नेहा माने, आकाश पायाळ, बंडू गवळी, सोमनाथ साळवे, नागनाथ निळ, रोहित कांबळे, जेम्स बालबद्र, विशाल ओव्हाळ, सनी पंजाबी, अजिंक्य म्हस्के, संजय पोटभरे, कुणाल साठे, अतुल गायतडाखे यांसह राज्यातील विविध भागांतील फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार, दलित पँथरचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×