Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

अपघातात ज्येष्ठ नागरिकासह पादचारी तरुणाचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – शहरातील मगळवार पेठेतील मालधक्का चौक, तसेच पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पुण्यात विविध घरफोडीत ६ लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी

वाघोली परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंतराव मारोतराव मगरे (वय ७३, रा. व्हिलशायर सोसायटी, वाघोली-केसनंद रस्ता, मूळ रा. यवतमाळ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत मगरे यांचा मुलगा आनंद (वय ४२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतराव मगरे मूळचे यवतमाळचे आहेत. त्यांचा मुलगा एका खासगी कंपनीत कामाला आहे. मगरे मुलाकडे राहण्यासाठी आले होते. २१ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास मगरे हे नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून निघाले होते. गिरीराज ज्वेलर्ससमोर ते रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात मगरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक हवाले तपास करत आहेत.

मंगळवार पेठेतील मालधक्का चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी भांगरे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (२२ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पादचारी तरुण मालधक्का चौकातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे २५ वर्ष असून, त्याची ओळख पटविण्यचे काम सुरू आहे. तो फिरस्ता असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×