Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

पतीकडून पत्नीच्या मित्राला मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

पतीकडून पत्नीच्या मित्राला मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Husband assaults wife’s friend :  पत्नीचे एका तरुणासोबत मैत्री झाल्याची माहिती मिळाल्यानतंर पतीने मित्रांना बोलावून तरुणाला मारहाण केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पतीसह त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वसिम युनूस मुजावर (वय २८, रा. शिंदे वस्ती, हडपसर), वैभव दिलीप अवचिते (वय १९, रा.आझादनगर, वानवडी) सुनील परशुराम अरदाऊर (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लातूरच्या आदर्श कॅम्पस प्रकरणात कठोर कारवाई करा-डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २४ वर्षीय तरुण एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात राहायला आहे. त्याची एका विवाहित तरुणीशी मैत्री झाली. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुण तिला भेटण्यासाठी कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता चौकात आला. (Husband assaults wife’s friend) याबाबतची माहिती विवाहित तरुणीच्या पतीला मिळाली. त्यानंतर आरोपीने मित्रांना बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी तरुणाला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

बाहेरून जेवण मागविल्याने पत्नीवर कात्रीने वार

बाहेरून जेवण मागविल्याने दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने पत्नीवर घरातील कात्रीने वार केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात घडली. पतीविरुद्ध गंभीर दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शुभम अशोक शेजवळ (वय २८, रा. सिद्धीविनायक काॅलनी, दत्तनगर चौक, आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत त्याची पत्नी शिवानी (वय २६) हिने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दारू पिऊन घरी आला. पत्नीने बाहेरून जेवण मागविल्याने शुभम पत्नीवर चिडला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून त्याने स्वयंपाकघरातील कात्रीने पत्नीच्या दंडावर कात्रीने वार केला. या घटनेत पत्नीच्या दंडाला दुखापत झाली. सहायक पोलीस निरीक्षक फिराेज मुलाणी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×