Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना

पंढरपूर येथे वारकरी भाविकांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना

marathinews24.com

पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना, आषाढी वारी-२०२५ दरम्यान वारी सुरु झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना यामुळे एक दिलासा मिळणार आहे.

सिंगापूरला निघाले दगडूशेठचे गणपती बाप्पा – सविस्तर बातमी

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (एसडीआरएफ/ एनडीआरएफ) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना द्यायवाच्या मदतीचे दर व निकर्ष २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार लागू केले होते. याप्रमाणे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता मदतीचे दर असणार आहेत.

ही मदत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांकरिता अपंगत्व, इस्पितळाचा खर्चाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

ही मदत आषाढी वारी-२०२५ करिता वारी सुरु झाल्याची तारीख अर्थात १६ जून २०२५ ते वारी समाप्त होण्याची तारीख १० जुलै २०२५ दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी, सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू असणार आहे. वारीदरम्यान अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस ४ लाख रुपये, अपघात किंवा दुर्घटनेमुळे ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये आणि ६० टक्क्याहून अधिक अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये, एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल असल्यास १६ हजार रुपये तसेच एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल असल्यास ५ हजार ४०० रुपये याप्रमाणे वारकरी अथवा त्याचे वारसदारास रक्कम मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत वारकरी किंवा त्यांच्या वारसाने सानुग्रह अनुदान मागणी करण्याबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावा. संबंधित वारकरी आषाढी वारी-२०२५ करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे तहसीलदाराचे प्रमाणपत्र मदतीच्या अर्जाबरोबर जोडावे. तहसिलदारांनीही संबंधित वारकरी हे आषाढी वारी-२०२५ करिता गेल्याची खात्री करुन संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदारांच्या मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे.

राज्य शासनाकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक् मदतीबाबत संबंधितांना रक्कम मंजूर करुन वितरीत करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू, वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात सानुग्रह अनुदान मंजूर करुन वितरित करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×