Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार- मंत्री उदय सामंत

हडपसरमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

marathinews24.com

पुणे – हडपसर मतदार संघातील अंतर्गत डीपी रस्ते व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा हडपसरमधील रहेजा चौक येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो नागरिक, मान्यवर, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीची मोर्चेबांधणी केली.

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण – सविस्तर बातमी

लोकार्पण प्रसंगी बोलताना नामदार उदय सामंत म्हणाले की,हडपसर मतदारसंघात होत असलेली ही विकासकामे ही जनतेच्या जीवनात शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाचेच द्योतक आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट दृष्टीकोनामुळे आणि जनतेशी असलेल्या बांधिलकीमुळेच हा वेगवान विकास शक्य झाला आहे. डीपी रस्त्यांच्या माध्यमातून हडपसर मतदार संघातील वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होईल प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि आपण तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

हडपसरच्या नागरिकांसाठी पुणे शहरात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्त्यांच्या लोकार्पणामुळे परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होवून नागरिकांना सुरक्षित, सुगम आणि वेगवान प्रवासाचा लाभ होईल. तसेच स्थानिक व्यवसाय, शाळा, आरोग्य सुविधा आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल होणार आहे. महानगरपालिकेच्या पातळीवर ही कामे अनेक वर्षे रखडलेली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाशी थेट समन्वय साधून घेतलेल्या पुढाकारामुळे ही कामे विक्रमी वेगाने पूर्ण झाली. “2 वर्षांत जे शक्य झाले, ते 20 वर्षांतही झाले नसते,” असे असेही सामंत म्हणाले

लोकार्पण सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, उद्योजक बाळासाहेब भानगिरे, स्वीकृत नगरसेवक राकेश झांबरे, स्विकृत नगरसेविका स्वाती टकले, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, विधानसभा समन्वयक अभिमन्यू भानगिरे, विभागप्रमुख सचिन नाना तरवडे, सचिन भानगिरे, सिद्धांत भानगिरे, अनिकेत जावळकर, युवा सेना महानगरप्रमुख राजेश पळसकर, उपशहरप्रमुख सुनील जाधव, लक्ष्मण आरडे, आनंद गोयल, नितीन पवार, संजय डोंगरे, संतोष लांडगे, विकी माने, दत्ता खवळे, सुधीर कुरुमकर, पंकज कोद्रे, शक्ती प्रधान, गिरीश जैवळ, भूषण वर्पे, सुदर्शना त्रिगुनाईत, सारिका पवार, श्रुती नाझिरकर, श्रद्धा शिंदे, सुरेखा पाटील, सोनाली लांडगे यांच्यासह हडपसर मतदार संघातील पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. सोहळ्याच्या माध्यमातून हडपसर मतदार संघात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केल्याचे दिसून आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×