Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात देशभक्तीने भारलेल्या वातावरणात ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

marathinews24.com

पुणे – भारत माता की जय, वंदे मातरम्… अशा घोषणांचा जयघोष, पारंपारिक वेशामध्ये नटलेले चिमुकले, मॅनेट कॅडेट्सची अभूतपूर्व कवायत आणि हजारो विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने भारलेल्या वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या ‘मॅनेट’ इमारतीच्या प्रांगणात भारताचा ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनी पॅरा शूटर निहाल सिंह ठरला गोल्डन बॉय ! – सविस्तर बातमी

नौदल कर्मचाऱ्यांचे माजी उपप्रमुख, व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर एस. पवार हे समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह, व्यासपीठावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डॉ.राजेश एस., प्रोवोस्ट प्रा.डाॅ.सायली गणकर, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर एस. पवार बोलताना म्हणाले, आपल्या महाराष्ट्रासह भारतीय नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये हिंदवी राष्ट्र निर्माणाची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाबाईंनी पेरली. अगदी तशाच प्रकारे आजच्या पिढीला घडविण्याची जबाबदारी प्रथम घरच्यांची आणि नंतर त्यांच्या शिक्षकांची आहे. आपल्याला भारताला जगात महासत्ता म्हणून प्रस्तापित करायचे आहे. ज्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. त्यामुळे, युवकांनी स्वतःला सुदृढ ठेवत, अमली पदार्थांपासून लांब राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. अनेकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण इथे आहोत. त्यामुळे, आजच्या दिनी स्वातंत्र्यविरांसह देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या शेतकरी, कामगार वर्गाचेही स्मरण करायला हवं. अशात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी ही युवकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे, कौशल्याधिष्ठीत युवकांची पिढी घडवून त्यांना देशासमोरील समस्या सोडविण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार ‘मॅनेट’च्या कॅडेट्सतर्फे करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×