Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

देखावे पाहण्यासाठी आलेल्या एकाची रिक्षा चाेरीला

देखावे पाहण्यासाठी आलेल्या एकाची रिक्षा चाेरीला

शनिवारवाडा परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या एकाची रिक्षा चोरून नेल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रिक्षाचालकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात गुरुवार पेठेतील सोसायटीत आग – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक कुटुंबीयासोबर रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी देखावे पाहण्यासाठी आला होते. त्याने शनिवारवाडा परिसरात रिक्षा लावली. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करुन रिक्षा चोरून नेली. देखावे पाहून रिक्षाचालक तेथे आला. तेव्हा रिक्षा जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार कोकाटे तपास करत आहेत.

तरुणाची दुचाकी चोरीला

शनिवारवाडा परिसरात दुचाकी लावून देखावे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घटना घडली. याबाबत एका तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण वाकड परिसरात राहायला आहे. शनिवारी (३० ऑगस्ट) तरुण मित्रासाेबत देखावे पाहण्यासाठी आला होता. शनिवारवाडा परिसरातील सूर्या हाॅस्पिटजवळ त्याने दुचाकी लावली. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार मानमाेडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×