Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

जलसंधारण दिनाची घोषणा; जलसंधारण मोहिमेला गती – विशेष लेख

‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा-चेतन कलशेट्टी

२१ ऑगस्टला जलसंधारण दिन; १५ ऑगस्टपासून जलसंधारण अभियानाला सुरुवात – महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, रील्स स्पर्धेसह विविध उपक्रमांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – पाणी आडवा, पाणी जिरवा हा मुलमंत्र देत राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी करणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने राज्यात त्या दिवशी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान ‘जलसंधारण अभियान’चे आयोजन करण्यात येणार आहे. जलसंधारण मोहिमेला मोठी चालना देणारा हा उपक्रम असणार आहे.

UPSCच्या अपयशातून DYSP पदापर्यंत; ओंकार कदम यांचा प्रेरणादायी प्रवास – सविस्तर बातमी 

शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देणे आणि जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्यशासनाने हाती घेतले असून या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी शासनाची अपेक्षा आहे.

जलसंधारणासाठी चालूया. सुरक्षित भविष्य घडवूया…!

मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने ‘माती वाचवा, पाणी जपा सुरक्षित भविष्य घडवाʼ या संकल्पनेवर आधारित शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन येणार आहे. या उपक्रमात पाण्याच्या संर्वधनाला अधिक महत्त्व देण्यात आले असून याकरिता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाʼ हे घोषवाक्य आहे. सर्व जिल्ह्यामध्ये जलसंधारण दिनी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे अशा प्रकारचे कार्यक्रमाचे स्वरुप आहे.

राज्यस्तरीय विविध उपक्रमाचे आयोजन

या उपक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदींच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातही लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील नामवंत, नागरिक, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत.

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्युआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार असून उपक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘एक रील… मातीसाठी !, एक रील… पाण्यासाठी !, एक रील… सुरक्षित भविष्यासाठी !’

जलसंधारण सप्ताह कालावधीत सर्व जिल्ह्यात १५ ते ३० वयोगटातील युवांसाठी जिल्हास्तरीय मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहेत. त्यांच्या कल्पकतेतून इन्‍स्टाग्रामच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.

प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करावी. छायाचित्रण किंवा रीलच्या सुरुवातीला छायाचित्रण व रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव स्पर्धकांनी नमूद करणे आवश्यक आहे. रील स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम खात्यावरुन पोस्ट करावी. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यालाही टॅग करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे. यामुळे एकाच हॅशटॅगखाली विक्रमी संख्येने रील्स तयार होऊन मोठ्या डिजिटल सहभागाची नोंद होणार आहे.

स्पर्धेसाठी एक अधिकृत क्युआर कोड तयार करण्यात आलेला असून क्युआर स्कॅन केल्यानंतर नोंदणी रीलची लिंक सब्मिट जिल्हा निवड→ पडताळणी → सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया असणार आहे. इन्‍स्टाग्राम हॅशटॅगबरोबर स्वतंत्र डिजिटल नोंदणी केल्यामुळे शासनाकडे प्रत्येक सहभागीची अधिकृत नोंद उपलब्ध राहणार आहे. रील्स अपलोड करण्याचा कालावधी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ असा आहे.

रील्स कोणत्या विषयावर बनवाल ?

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत. रील्स बनवितांना कथाकथन (स्टोरीटेलिंग), अभिनय, संगीत, नृत्य, ॲनिमेशन, एआय क्रिएटीव्ह, हास्यव्यंग, शॉर्ट फील्म, बीफोर- ॲक्टर, ड्रोन व्हिजुअल्स किंवा अन्य नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक राहणार आहे.

रील्सकरिता गुणांकन पद्धती

विषय व संदेश – ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश – २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ गुण, इन्स्टाग्रॉम एंगेजमेंट – १० गुण असे एकूण १०० गुण असणार आहेत. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि समाज माध्यम एंगेजमेंट या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

रील स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये, द्वितीय १५ हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार १० हजार रुपये व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.

जलसंधारण अभियान

या स्पर्धेसोबतच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा (विषय: जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे महत्त्व, जल है तो कल है, जलसंवर्धन उपाय, घरातील पाण्याचा वापर – वॉटर बजेट), चित्रकला, पोस्टर स्पर्धा- जलसंवर्धन उपाय, पाणी बचत उपाय, पाणी साठवणूक (रेन वाटर हॉर्वेस्टिंग), वाद-विवाद स्पर्धा (विषय- जलसंधारण शासनाची जबाबदारी की जनतेची जबाबदारी, इतर विषय), एक शाळा- एक शोषखड्डा उपक्रम राबविणे, सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्त्व विद्यार्थांना सांगणे, जलमित्र, जलदूत घोषित करणे, २१ ऑगस्ट रोजी शाळेत माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणे, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुरस्कार वितरण करणे, गावातील किंवा शहरातील जलतज्ज्ञ, प्रतिष्ठीत व्यक्ती यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित करणे असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती मृद व जलसंधारण विभागाच्या समाज माध्यमांवर उपलब्ध आहे.

संकलन : विभागीय माहिती कार्यालय, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×