Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाच प्रकरणात पकडले

पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाच प्रकरणात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – तपासात मदत करणे, तसेच जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी एक लाखांची लाच मागणाऱ्या मुळशीतील पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. तडजोडीत तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना सहायक फौजदाराविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४६, रा. ग्रीन फ्लाॅरेन्झा सोसायटी, सूस, ता. मुळशी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात दोन कोटींची फसवणूक; कर्नाटकातून सायबर चोरटे अटकेत – सविस्तर बातमी 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गु्न्ह्यात जप्त केलेली गाडी परत करणे, तसेच तपासात मदत करण्यासाठी सहायक फौजदार शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदाराने तडजोडीत ३५ हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर पौड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मुळशी चौकीच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना शिंदे यांना सायंकाळी पकडण्यात आले. रात्री उशीरा पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन शिंदे यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भाेसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दयानंद गावडे, प्रशांत चौगुले आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×