कुत्र्याला मारहाण; विरोध केल्यावर दांपत्याला धमकी

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरीफरार

आरोपीविरुद्ध मारहाण, धमकी तसेच प्राण्यांवरील क्रूरतेसंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भटक्या कुत्र्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक घटना मांजरी परिसरात घडली आहे. या घटनेला विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत धमकावल्याचाही प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दत्ता शिंदे (वय ३५, रा. आराध्या रेसिडन्सी, देवनगरी कॉलनी, शिवराज हॉटेलजवळ, झेड कॉर्नर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना ५ एप्रिलला रात्री पावणे अकराच्या घडली आहे.

जबरी चोरी करून जेष्ठाच्या खून, सराईताला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीकडे भटके कुत्रे धावून आल्याच्या कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात त्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे कुत्रा बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेदरम्यान तक्रारदारांनी जाब विचारला असता आरोपीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार महिलेशी अश्लील वर्तन करत ‘तुलाही मारून टाकीन’ अशी धमकी देत तिच्या अंगावर धावून गेला. यावेळी तक्रारदाराच्या पतीलाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणात आरोपीविरुद्ध मारहाण, धमकी तसेच प्राण्यांवरील क्रूरतेसंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×