जबरी चोरी करून जेष्ठाच्या खून, सराईताला अटक

जबरी चोरी करून जेष्ठाच्या खून, सराईताला अटक

विविध गुन्ह्यांची उकल , पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शेतातील घरात झोपलेल्या जेष्ठाच्या डोक्यात लोखंडी पहार मारून खून करीत जबरी चोरी करणार्‍या सराईताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर उपस्थित होते.

पुण्यात पोलिसांनीच केले प्राचार्यांना ब्लॅकमेल, ७ लाखांची खंडणी उकळली – सविस्तर बातमी 

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे पानईमळा परिसरात जेष्ठ शेतकरी दामोदर जयराम मिंडे (वय ६२) हे ३१ मार्चला रात्रीच्या सुमारास शेतातील घरात झोपले होते. त्यावेळी दरोड्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांच्या डोक्यात पहारेने मारून खून करीत २९ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा माग काढण्यास गती दिली. आरोपींनी दुचाकीवर प्रवास केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने ६० किलोमीटर परिसरातील १०० सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. संबंधित दुचाकी आरोपी कबीर काळे याची असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कबीर उंबर्‍या काळे (वय २४ रा. सुरेगाव, श्रीगोंदा, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपी कबीर काळेविरूद्ध ९ गंभीर गुन्हे दाखल असून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याच्याकडून आणखी चार गुन्ह्याची उकल केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, एपीआय महादेव शेलार, एपीआय सुनील बडगुजर, उपनिरीक्षक सुनील धनवे, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, दीपक साबळे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, मंगेश थिगळे, सुजाता कदम, संजय नाडेकर, योगेश रोडे यांनी केली आहे.

दोन टोळ्यातील चार सराइतांना अटक

शिरूर शहरात जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चार सराईतांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी महिलेच्या गळ्यातील ३ लाखांचे दागिने हिसकावले होते. तर वेल्हे परिसरात दोन चोरट्यांनी एकाला मारहाण करून डोळ्यात मिरचीपूड फेकून १८ तोळे लुटले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने १४५ किलोमीटरवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. अनिल गोरखनाथ मस्के (वय ३३ रा. पिंपरी-िंचचवड) आणि अभिजीत सुभाष रॉय (वय २६ रा. चिखली ) या सराईतांना अटक केली. वेल्ह्यातील गुन्ह्यात अभिषेक सचिन खुटवड (वय २३) आणि प्रसाद सतीश शिंदे (वय २१ रा. वेल्हे ) यांना अटक केली. संबंधित आरोपींकडून १ लाख ९४ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अक्षीक्षक रमेश चोपडे, प्रशांत ढोले, पीआय प्रमोद क्षीरसागर, संदेश केंजळे, एपीआय दत्ताजीराव मोहिते यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×