पुण्यात पोलिसांनीच केले प्राचार्यांना ब्लॅकमेल, ७ लाखांची खंडणी उकळली

पोलीस उपनिरीक्षकासह रील स्टार दामिनी मार्शलविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयीन प्राचार्यांना पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत ब्लॅकमेल करून तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि रील स्टार व दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात निधन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ५५ वर्षीय तक्रारदार शिवाजीनगर परिसरातील महाविद्यालयात प्राचार्य आहे. त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत पोलीस उपनिरीक्षक बडे आणि इतरांनी त्यांना धमकावले. त्यानंतर तडजोड करून ७ लाख रुपयांची खंडणी उकळली. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित बडे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल आहे. ती सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणूनही ओळखली जाते. सुदाम तायडे हेदेखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

हा गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाणे येथे दाखल झाला आहे. घटनेमुळे पोलीस विभागाच्या प्रतिमेला तडा गेला असून, वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने बघत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×