Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

हिंजवडीत पोलिस अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय

हिंजवडीत पोलिस अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय

अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक

marathinews24.com

पिंपरी चिंचवड – हिंजवडीत पोलिस अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या पोलीस अधिकारी बालाजी पांढरे यांच्यावर गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे. ७ ऑगस्टला आमदार शंकर मांडेकर अतिक्रमणाबाबत चर्चा करीत असताना त्यांच्या समक्ष हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी चर्चेमध्ये खंड पाडला. काही शेतकरी बांधवांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती च्या चांदीच्या मूर्ती ची विधिवत पूजा ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरामध्ये संपन्न – सविस्तर बातमी 

अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे म्हणाले की हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केलेली अरेरावी, शिवराळ भाषा अशोभनीय आहे. सरकारचा आणि पी एम आर डी चा जो चाललेला अनागोंदी कारभार शेकऱ्यांना मारणारा आणि हिंजवडी मान, मारुंजी रोड येथील बिल्डर लॉबीला तारणारा आहे. शेकऱ्यांना विश्वासात घेवून सरकारने भविष्यातील निर्णय घ्यावा. नुकतीच आम्ही पिंपरीची चिंचवडचे पोलिस आयुक्त यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास छावा संघटनेचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश अध्यक्ष व शेतकरी नेते व विजय घाडगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे म्हणाले की शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, मग्रूर, मदमस्तवाल पोलीस अधिकारी बालाजी पांढरे यांच्यावर गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करण्यात यावी. शांतपणे चर्चा सुरू असताना हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी चर्चेत सहभागी होण्यासाठी बोलवले असता त्यांनी त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत आणि शिवराळ भाषा वापरली.

संबंधीत घटनेतील दोषींवर कारवाई न झालेस अखिल भारतीय छावा संघटने मार्फत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणेत येईल. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचे मनोज आण्णा मोरे, मच्छिंद्र चिंचोळे, अक्षय बोडके, प्रशांत फड, सचिन लिमकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×