दागिने लांबविण्याचे सत्र कायम
marathinews24.com
पुणे – पीएमपी प्रवाशांकडील दागिने लांबविण्याचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांसह तिघांचे दागिने प्रवासादरम्यान लांबविल्याची घटना घडली.
व्याज परताव्यासोबतच उद्योजकता प्रशिक्षण – सविस्तर बातमी
कात्रजमधील आंबेगाव परिसरात पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. याबाबत महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मंगळवारी (७ ऑक्टोबर) पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले.
स्वारगेट एसटी स्थानक परिसरात एका प्रवासी तरुणाच्या गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण सांगली जिल्ह्यातील खानापूरमधील आहे. तरुण कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत असताना चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. हडपसरमधील रवीदर्शन थांब्यावर पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.





















