‘महोत्सव जैन धर्मका’मध्ये भावसंगीताचा अविस्मरणीय अनुभव
marathinews24.com
पुणे – पंचकल्याणक सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘महोत्सव जैन धर्मका’ या भक्तिसंध्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार व पार्श्वगायक हर्षित अभिराज यांच्या सुरेल सादरीकरणाने नांद्रेकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
राज्यस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पुरंदर येथे संपन्न – सविस्तर बातमी
मैफिलीची सुरुवात पवित्र णमोकार मंत्राने झाली. त्यानंतर ‘जगमे गुरु जैसा साथी’ या गीतातून त्यागी साधूंना वंदन करण्यात आले. ‘मेरा प्यारा परिवार’, ‘आया महोत्सव’, ‘पंचकल्याणक णमोकार का’, ‘महोत्सव जैन धर्मका’ या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय झाले.
‘नांद्रेवाले वीर बाबा’, ‘नांद्रे गावाची शान महावीर मंदिर’, ‘गाडी घुंगरांची’, ‘महावीरांच्या बारशाला’, ‘पंखिडा’ या गीतांवर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठेका धरला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर व प्रसिद्ध संगीतकार रविंद्र जैन यांना हर्षित अभिराज यांनी अर्पण केलेली स्वरांजली विशेष ठरली.
वाद्यवृंद संचालन मंगेश सारंग, मंच संचालन राजेंद्र जैन यांनी केले. गायनसाथ नम्रता गुरव, रसिका झावरे, अभिजीत पाटील व महेश शिकलगार यांनी दिली. हा भक्तिसंगीत सोहळा नांद्रेकर रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला.
























