Breking News
एसएनडीटी मध्ये  महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्नडी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंतकारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

राज्यस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पुरंदर येथे संपन्न

राज्यस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

marathinews24.com

पुणे – समाज कल्याण विभागाअंतर्गत ९२ शासकीय निवासी शाळा व २ शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कीडानैपुण्य विकसित होण्यासाठी २ ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, दिवे पुरंदर येथे आयोजित करण्यात आल्या.

युरोजेनिटल कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखणे गरजेचे- डॉ. संजय कुलकर्णी – सविस्तर बातमी 

उपआयुक्त विजयकुमार गायकवाड, शिक्षण उपसंचालक निशाताई बंडगर, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, सांगलीचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, विशेष अधिकारी शालिनी प्रभे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

सह आयुक्त जाधव आणि उपायुक्त गायकवाड यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कोचुरे यांनी तर कार्यक्रमाचे आभार लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले. समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, गृहप्रमुख, गृहपाल, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे क्रीडा शिक्षक पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेचा निकाल

सांघिक क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील गटात खो-खो माये नाशिकचा संघ विजेता तर नागपूर संघ उपविजेता ठरला. फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद लातूर संघाने तर छत्रपती संभाजीनगर संघाने उपविजेतेपद मिळविले. ४०० मीटर रिले क्रीडाप्रकारात प्रथम विजेता नागपूर संघ, द्वितीय नाशिक संघ तर पुण्याचा संघ तृतीय विजेता ठरला. वैयक्तिक क्रीडाप्रकारात १०० मी. व २०० मी. धावण्याच्या स्पर्धेत पुण्याच्या अनुक्रमे प्रिया बोगटी व शुभांगी सानप यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत नागपूरची जयश्री वैद्य प्रथम विजेती ठरली.

सांघिक क्रीडा प्रकारात १७ वर्षाखालील गटात खो-खो मध्ये नाशिकचा संघ विजेता तर पुणे संघ उपविजेता ठरला, फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद लातूर संघाने तर छत्रपती संभाजीनगर संघाने उपविजेतेपद मिळविले. ४०० मीटर रिले क्रीडा प्रकारात प्रथम विजेता पुणे संघ, द्वितीय नाशिक संघ तर छत्रपती संभाजीनगरचा संघ तृतीय विजेता ठरला, वैयक्तिक क्रीडा प्रकारात १०० मी. धावण्याच्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरची आश्विनी सुनेवाड प्रथम क्रमांक मिळवला. २०० मी. व ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत अमरावतीच्या अनुक्रमे अमिता धुरंधर व धरती बेहडे यांनी प्रथन क्रमांक पटकाविला. थाळीफेकमध्ये लातूरची राधा सुरासे प्रथम तर लांबउडी स्पर्धेत पुण्याची आरती पटेकर प्रथम आली.

लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक-मुलींची शासकीय निवासी शाळा राजे हदगाव जिल्हा भंडारा नवापूर (विभाग-नागपूर) यांनी मिळवला तर भूमिका अभिनयातही नागपूर विभागानेच बाजी मारली. पुणे संघाला जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी-प्रथम क्रमांक वैयक्तिक खेळाच्या एकत्रित गुणांकानुसार प्राप्त झाला, असे सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×