Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

संतोष देशमुख हत्या प्रकरण, एटीआर समितीत बदल

संतोष देशमुख हत्या प्रकरण, एटीआर समितीत बदल

सुग्रीव धपाटेंची नियुक्ती; कारवाई अहवालाला वेग येणार

marathinews24.com

मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर आधारित क्शन टेकन रिपोर्ट’ (एटीआर) तयार करणाऱ्या समितीच्या रचनेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. समितीतील सहसचिव व्यंकटेश भट यांच्या जागी आता सहसचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती केली आहे. या बदलामुळे एटीआर प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती – सविस्तर बातमी  

उच्चस्तरीय समितीची जबाबदारी या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत प्रधान सचिव तसेच अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे. अहवालातील गंभीर निरीक्षणे, त्रुटी आणि जबाबदार्या निश्चित करून दोषींवर कोणती कारवाई करावी, याबाबत स्पष्ट शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

ताहलियानी समितीने सुचवलेल्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची पडताळणी करणे, भविष्यात अशा
कोणत्याही तक्रारी, घटना किंवा चौकशी अहवालानंतर प्रशासन, पोलीस किंवा संबंधित विभागाने प्रत्यक्षात कोणती व कशी कार्यवाही केली, याची सविस्तर व अधिकृत नोंद एटीआरमध्ये दिली जाते.या अहवालात दोषींवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, कोणते सुधारात्मक उपाय राबवण्यात आले तसेच पुढे कोणते पावले उचलण्यात येणार आहेत, याचा तपशील नमूद केला जातो. पारदर्शकता वाढवणे, जबाबदारी निश्चित करणे आणि संबंधित समस्या खरोखरच निकाली निघाली आहे की नाही, याची खात्री करून देणे हाच एटीआरचा मुख्य उद्देश असतो.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×