Breking News
वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्नएसएनडीटी मध्ये  महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्नडी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंतकारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

पुण्याजवळ गावठी दारूभट्टी उध्वस्त, ८ हजार लीटर रसायन केले नष्ट

पुण्याजवळ गावठी दारूभट्टी उध्वस्त, ८ हजार लीटर रसायन केले नष्ट

भावडी गावात कारवाई

marathinews24.com

पुणे – छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गावठी दारूभट्टी निर्मितीचा अड्डा गुन्हे शाखेच्या युनीट सातने उध्वस्त केला आहे. त्याठिकाणाहून तब्बल ८ हजार लीटर रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत ३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई ५ फेबु्रवारीला वाघोलीजवळील भावडी गावात केली. प्रल्हाद कदम राठोड (वय २५, रा. भावडी, ता.हवेली, जि.पुणे, रा.मुळ टेकवडी, ता. पुरंदर ) आणि अंकिता गणेश गुडदावत (वय २३ रा. भावडी, ता. हवेली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांची फोनवरून मस्करी करणे युवकाला भोवले – सविस्तर बातमी  

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनीट सातचे पथक ५ फेबु्रवारीला वाघोली परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निर्णय लांडे व बाळासाहेब तनपुरे यांना भावडीजवळील तांबे वस्ती खदानीजवळ एकजण गावठी हातभट्टी तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी प्रल्हाद राठोड आणि अंकिता गुडदावत यांना ताब्यात घेण्यात आले. तब्बल २ लाख ८० हजारांचे ८ हजार लीटर रसायन नष्ट करण्यात आले.

गावठी हातभट्टी निर्मितीसाठी जमीनीखाली खड्डा खोदल्याचे दिसून आले. ९ प्लास्टिकचे रिकामे कॅन, दोन लोखंडी टोप, लाकडी फळया असा २ लाख ९५ हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमानुसार वाघोली ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, विनायक साळवे, निलेश साळवे, सुहास तांबेकर, नेहा तापकीर, निर्णय लांडे, बाळासाहेब तनपुरे, सोनाली नरवडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×