व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहात प्रवेश सुरु

१८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाच्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या योजनेंतर्गत इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड यांनी केले आहे.

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी – सविस्तर बातमी

पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी योजनानिहाय वेळापत्रकानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×